प्रज्ञालोक – संकेतरेखा नवभारतस्य
‘प्रज्ञालोक’ या नावाचे त्रैमासिक शके १८८० च्या [ इ. स. १९५८ एप्रिल ] चैत्र पौर्णिमेला (नागपूर) सुरु झाले. भारतीय राष्ट्रीय विचारसरणी तर्कशुद्ध, अभ्यासपूर्ण, पद्धतीनी मांडल्या जावी ही या मासिकाच्या मागची प्रेरणा होती. मासिकाचे उदघाटन मा. बापुजी अणे यांच्या हस्ते झाले. कै. गं. त्र्य. माडखोलकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

कै. प. पू. अप्रबुद्ध

कै. डॉ. ब. स. येरकुंटवार

कै. श्री. विठ्ठलराव गोखले

कै. डॉ. गु. वा. पिंपळापुरे

कै. श्री. भालचंद्र वर्तक
ताजा अंक
संकेतरेखा नवभारतस्य
प.पू. कै. अप्रबुद्धांनी लिहिलेल्या ‘ब्रह्मर्षि अण्णासाहेब पटवर्धन’ ह्यांच्या चरित्रात दोन संस्कृत स्तोत्रांचा समावेश आहे. त्यापैकी एका स्त्रोत्रातील 5 वा श्लोक खालीलप्रमाणे आहे. सा केतकीपत्र सुगौर मूर्ति ।साकेत केशस्ययशः प्रपूर्तिः ।संकेत रेखा नवभारतस्यदृशां नराणां कृतकृत्यतैव । अर्थ – श्रीरामाच्या यशाची फाकलेली प्रभाच जणू अशी ती केवड्याप्रमाणे गौर मूर्ती, आधुनिक भारत कसा असावा याचे उदाहरण घालून देत,…
मागील अंक
काही निवडक
गुरुचरित्र – एक चिंतन
“अवतार हे उदंड होती । सर्वची मागुती विलया जाती । तैशी नव्हे दत्तात्रेय मूर्ती । नाश कल्पांती असेना ॥”सर्व विश्वात भारतभूमी ही देवभूमी आहे. तशीच ती ऋषीमुनींची तपोभूमी आणि ज्ञानभूमीपण आहे. मानवासाठी तिची कर्मभूमीतपण गणना होते. साधुसंतांनी तर तिच्या रोमारोमातून भक्ती फुलवली आहे. ‘आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना ॥ उपासका सांपडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे ॥’ ही त्रिसुत्री येथील जीवनधारा आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती व्हायला पाहिजे असेल तर ज्ञान मिळविणे हे क्रमप्राप्त आवश्यक आहे. कर्माने चित्ताची शुद्धता होते. उपासनेने, भक्तीने, चित्ताला स्थिरता येते आणि शुद्धता आणि स्थिरता एकत्र नांदायला लागली की तेथेच ज्ञान प्रकट होते. मनुष्य जन्म कृतार्थ होतो. कर्म आणि उपासना हे साधनरूप आहेत तर ज्ञान हे साध्यरूप आहे.परमेश्वराचे अनेक अवतार झाले आहेत. पुढेही होणार आहेत. त्याच कार्यकारणभाव भगवंताने वेळोवेळी प्रकटही केला आहे. भगवत्गीतेत त्याने तो सांगितला-पण आहे. “यदा यदा ही धर्मस्य… ॥1॥ परित्राणाय साधुनां… ॥2॥ यातील पहिला श्लोक कारणरूप आहे तर दुसरा श्लोक कार्यरूप आहे. अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना हे कारण आहे. तर साधुंचे रक्षण करून दुष्कृतांचा नाश हे कार्य आहे. वेळोवेळी हे मला करावे लागले, असे भगवंत म्हणतात. याशिवाय मी आणखीन हे एक कार्य करतो. ते म्हणजे या पृथ्वीतलावर शुद्ध ज्ञान प्रकट करतो. अज्ञानांधस्थ लोकस्य… तस्मै श्री गुरवे नमः आणि मला त्यासाठी गुरुतत्त्वाच्या आविष्काराचा स्वीकार करावा लागतो. कारण व कार्य येथे एकरूप होते. साधन आणि साध्य एकजीव होतात. द्वैतभाव समाप्त…
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
आज आपणा सर्वांना आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायची इच्छा असते. सरकारी नोकरी, बँक, शाळा, महाविद्यालय, खासगी कंपनी, क्रीडा, सामाजिक कार्य, व्यवसाय, उद्योगधंदे इत्यादी कुठल्याही क्षेत्रात काम करणारी माणसे असो अथवा विद्यार्थी असो, यशस्वी प्रत्येकालाच व्हायचे असते. पण हे त्रिकालाबाधित सत्य आहे की सगळेच यशस्वी होत नाहीत. कारण यश मिळविण्यासाठी आवश्यक गुणांची आराधना लोक करीत नाही. जगात 3 प्रकारची लोकं असतात. पहिले ‘कष्टाळू’, दिवसरात्रीची पर्वा न करता प्रचंड मेहनत करणारे, काम पूर्ण झाल्याशिवाय आराम न करणारे लोक म्हणजे कष्टाळू. यश केवळ कष्टाळू लोकांनाच प्राप्त होते. दुसर्या प्रकारचे लोक असतात ‘कष्ट-टाळू’ आणि तिसरे ‘कसं टाळू’. या दोन प्रकारच्या लोकांना कधीच यश मिळत नाही. आपण मात्र विचार करावा की आपण या तीन श्रेणींमध्ये कुठे बसतो. कारण आज मी ज्या चरित्राबद्दल लिहिणार आहे ती व्यक्ती निःसंशय यशस्वी होती आणि म्हणूनच कष्टाळू होती. पण म्हणतात ना नायकाला समजायचे तर आधी खलनायक समजावा लागतो. रामचंद्र समजून घ्यावयाचे तर पहिले रावण समजावा लागतो. कृष्ण समजावून घ्यावयाचे तर पहिले कौरव समजावे लागतात. तद्वत शिवाजीराजांना समजून घ्यायचे असेल तर तत्कालीन परिस्थिती समजून घ्यावी लागते. एका बाजूला तर धातुशास्त्र, आयुर्वेद, योग, दर्शनशास्त्र, वेद, कला, संगीत, स्थापत्य यांनी बहरलेला आमचा देश. सुसंपन्नता, सौख्य, स्थैर्य हेच ज्याचे गुणालंकार होते आणि चारित्र्यवान, सुहृदयी, संवेदनशील, समाधानी प्रजा ही ज्याची परिचायक होती अशा सनातन धर्माचा भारत देश. पण जशी संपन्नता येते तशी ती लुटणारे पण येतात. शक, हूण, कुशाण, अलेक्झांडर असे अनेक आक्रमक आले पण त्या…
शतपैलु व्यक्तिमत्व – प्राचार्य अनंतराव आठवले
पू. अनंतराव आठवले यांचा जन्म अनंत चतुर्दशी शके 1842 दि. 28.8.1920 या दिनी पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव साधाबाई व वडिलांचे नाव दामोदर होते. ते दासगणू महाराजांचे शिष्य व मानसपुत्र होते. त्यांचा आवाज भरदार, मर्दानी व सुरेल होता. ते दासगणू महाराजांच्या कीर्तनात गाण्याची साथ करीत. त्यांचा आवाज आणि देखणे रूप पाहून संगीत नाटक मंडळींकडून त्यांना भूमिका करण्यासाठी निमंत्रण येत. पण त्यांनी दासगणू महाराजांची कीर्तनातील गायनाची सेवा सोडली नाही. त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यावेळी अप्पा (अनंतराव) दीड वर्षांचे होते. तेव्हापासून त्यांचा सांभाळ त्यांच्या मातेने व दासगणू महाराज यांनी केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण पंढरपुरात आपटे प्रशाळा व लोकमान्य विद्यालयात झाले. पुढे आयुर्वेद महाविद्यालयातून ते पदवीधर झाले व त्याच महाविद्यालयात प्राध्यापक व पुढे प्राचार्य झाले. त्यांचा विवाह पंढरपूरचे स्टेशनमास्तर लिमये यांची कन्या इंदिरांशी झाला. सौ. इंदिरा म्हणजे साक्षात् लक्ष्मीच होत्या. महाकवींच्या सान्निध्यात प्रतिभेला बहर संतकवी दासगणू महाराज हे महाकवी. आपण बोलतो तशा काव्याच्या ओळी त्यांच्या मुखातून आपोआप बाहेर पडत. त्यांच्या मांडीवर बसून अप्पा काव्य ऐकत ऐकत लहानाचे मोठे झाले व त्यांच्या उपजत प्रतिभेला अंकुर फुटले. दासगणूनी एकदा श्लोकाच्या तीन ओळी म्हटल्या तर बाळ अनंताने चौथी ओळ म्हटली. दादांनी ती ओळ तशीच ठेवली. अप्पांची प्रतिभा बहरू लागली. ते प्राध्यापक झाले तरी उत्सवात पंढरपूरला येऊन कीर्तने व प्रवचने करू लागले. कीर्तनापूर्वी दादांच्या पाया पडायला गेले की दादांनी सांगायचे ‘अनंता आज हे आख्यान सांग’ व अप्पांनी ते आख्यान सांगायचे. अप्पांचे कीर्तन म्हणजे…